NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

NCP MLA Disqualification Result: राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला असून शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मुळचा अजित पवारांचा असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला आहे. आमदारांच्या संख्याबळावर पक्ष कुणाचा असेल हे ठरवले जाईल, असे नार्वेकरांनी सांगितले आहे. अजित पवार गटाकडे ५३ पैकी ४३ आमदार आहेत. त्यामुळे अजित पवार गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे नार्वेकरांनी सांगितले आहे.