Mahadev Jankar | मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मला फटका बसला

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा काही प्रमाणात फटका आपल्याला बसला असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रात ४८ जागांपैकी महायुतीला ४२ जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला फक्त ६ जागा मिळतील, असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे.

ते म्हणाले, मी विकासाच्या माध्यमातून काम करतो. सब समान तो देश महान हा माझा अजेंडा आहे. माझ्या पक्षातून पहिले दोन आमदार हे मराठा समाजाचे झाले. माझ्या पक्षाचा एक विद्यमान आमदार हा ओबीसी आहे. तसेच काही ठिकाणी मुस्लिम समाजाचे नगरसवेक आहेत. त्यामुळे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा माझा अजेंडा आहे. मी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला माणनारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व समाजाची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. या इराद्याने पुढे चाललो आहे. मात्र, काही प्रमाणात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मला फटका बसला, असंही महादेव जानकर यावेळी म्हणाले.

महायुतीला ४२ जागा मिळतील तर महाविकास आघाडीला सहा जागा मिळतील. देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आणि परभणीचा खासदार म्हणून मी शपथ घेईल”, असं महादेव जानकर (Mahadev Jankar ) म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप