काय राव अजित दादा तुम्ही अंधभक्तांची गोची केली वो…; ठाकरे गटाने डागली तोफ

पुणे – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे. राजभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला असताना आता ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ पाटील यांनी भाष्य केले असून विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. बस आता एकच स्वप्न उराशी बाळगून आहे अन ते म्हणजे आमचे परममित्र अमोलराव अन गोपीचंद पडळकर आता मांडीला मांडी लावून बसणार का..? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अंधभक्त ज्या अमोल मिटकरी यांना मटनकरी, बाजारु विचारवंत, वगैरे वगैरे….  म्हणून ट्रोल करायचे आता तेच अंधभक्त आमच्या अमोलरावांची बाजू पटवून देणार आहेत…. काय राव अजित दादा तुम्ही अंधभक्तांची गोची केली वो… असं म्हणत त्यांनी भाजप समर्थकांना टोले लगावले आहेत.