पुणे जिल्ह्यात ‘महाविजय’ साकारण्याचा महायुतीचा निर्धार!

Loksabha Election 2024:- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पुणे जिल्हास्तरिय पहिल्याच मेळाव्याला महायुतीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका एकदिलाने, ताकदीने लढण्याचा आणि जिंकण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट), जे.एस.एस., रासप, पी.जे.पी., ब.रि. एकता मंच, आरपीआय (खरात गट), पी.आर.पी., ब.वि.आ., स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना आणि शिवसंग्राम या पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार श्रीरंग बारणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. दत्तात्रय भरणे, आ. चेतन तुपे, आ. सुनील टिंगरे, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. महेश लांडगे, आ. उमा खापरे, आ. सुनील कांबळे, आ. राहुल कुल, राजेश पांडे, दिलीप कांबळे, बाळा भेगडे, सुरेश घुले, दीपक मानकर, धीरज घाटे, शंकर जगताप, वासुदेव काळे, शरद बुट्टे पाटील, प्रदीप गारटकर, शिवाजीराव आढळराव पाटील, विजय शिवतारे, अजय भोसले, प्रमोद भानगिरे, परशुराम वाडेकर, भरत लगड, संजय आल्हाट, किशोर भोसले, इरफान सय्यद, उल्हास तुपे, रमेश कोंडे, किरण साळी, जगदीळ मुळीक, बापू पठारे, शरद सोनवणे, शरद ढमाले, श्रीनाथ भिमाले, उल्हास तुपे, बाळासाहेब चांदेकर, भगवान पोखरकर, बाळासाहेब वाल्हेकर, किशोर भोसले, विकास रेपाळे, पोपटराव गावडे, विलास लांडे, दिंगबर दुर्गाडे, योगेश बहल, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, प्रदीप देशमुख, राजलक्ष्मी भोसले, बाळासाहेब जानराव, सूर्यकांत वाघमारे, मंदार जोशी, शैलेंद्र चव्हाण, अतित गांगुर्डे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत, संजय सोनावणे, संगीता आठवले, विक्रम शेलार, निलेश आल्हाट, राजाभाऊ कांबळे, दत्ता सागरे, संदीप खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी प्रास्ताविकात म्हणाले, ‘हा मेळावा लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या विजयाची नांदी आहे. एका विचाराने सर्व नेते एकत्र आले आहे. त्यातून राज्याच्या विकासाला गती मिळत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने एकमेकांमध्ये समन्वयाचा प्रयत्न करण्यात आला. श्रीराम नामाच्या ताकदीमुळे काँग्रेसचे नेते घाबरले आहेत. काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यांना उमेदवार मिळतो की नाही अशी शंका आहे.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि या मेळाव्याचे जिल्हा समन्वयक मुरलीधर मोहोळ यांनी मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. मोहोळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकार आणि राज्यातील महायुतीचे सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारबद्दल लोकप्रियता आहे. सरकारमधील सर्व पक्ष एकजुटीने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि विकासासाठी कटीबद्ध आहेत. त्याचप्रमाणे आगामी काळातील निवडणुकांमध्ये महायुतीतील सर्व पक्ष आणि संघटना यांनी एकत्र येऊन समन्वय साधने आवश्यक आहे. एकमेकातील समन्वयासाठी राज्यातील ३६ शासकीय जिल्ह्यांमध्ये आज महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले.

‘आगामी काळात विभाग स्तरावर सहा मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. महायुतीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चारही जागा विधानसभेच्या सर्वच्या सर्व 21 जागा, दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषदेत निवडणुकीत बहुमताने विजय संपादन करू असा विश्वास व्यक्त करतो. त्यासाठी आजचा महायुतीचा जिल्हा मेळावा महत्त्वाचा आहे’, असेही मोहोळ म्हणाले.

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, ‘मोदींच्या कार्यशैलीमुळे आपण एकत्र आलो आहोत. 72 साली दुष्काळात मिलो खाणारा देश आता पाच ट्रीलियन डॉलरची अर्थव्यवस्था होत आहे, हे दुसऱ्या पक्षातून आलेल्यांमा हे आकर्षण आहे. राजकीय विचारधारा काही असली तरी मोदींची विकासाची विचारधारा हाच भारताचा धर्म होईल. राजकीय इच्छाशक्ती आणि अपार कष्ट करायची ताकद इतर पक्षातील नेत्यांना भावत आहे’.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच 73 हजारांच्या पार, निफ्टी 22 हजारांच्या वर

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका