संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका 

Amol Mitkari : महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा अकोला येथे पार पडला. यावेळी  बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “संजय राऊतांचे 3 इंद्रिये निकामी झाले आहेत. मेंदू, जीभ आणि डोळे हे ते इंद्रिय आहेत”, अशी जहरी टीका अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 44 आमदार 4 खासदार आणि अख्खा पक्ष अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे संजय राऊतांनी डोळ्याला झालेल्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे. अजित पवार संजय राऊतांना उत्तर देणार नाहीत. आम्ही कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहोत.”

महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, पुलोदचे सरकार स्थापन झाले तेव्हा जनसंघाचे लोकही सोबत होते. असा प्रयोग अजित पवार यांनी केला तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा अजित पवार ढाल बनून पुढे गेले. जे पोटात आहे ते त्यांच्या ओठात आहेत, असेही मिटकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

शंकराचार्यांचे हिंदू धर्मातील योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना नाशिकचे साधू महंत म्हणाले…

ओरीचा भलताच जोर; थेट तृप्ती डिमरीला मिठी मारत किस घेतल्यानं एकच चर्चा रंगली

इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत लवकरच चर्चा होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार