Mahesh Tapase | सध्या देशातील वातावरण मोदी सरकार विरोधात, शरद पवार गटाच्या महेश तपासेंचा दावा

Mahesh Tapase | देशामध्ये सध्या इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात जनतेमधून प्रतिसाद मिळत आहे. ४ जून नंतर देशांमध्ये इंडिया आघाडीची सरकार येईल अशी परिस्थिती सध्या देशात आहे. जनतेने मोदीची गॅरंटी नाकारली आहे. त्यामुळेच देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

महेश तपासे म्हणाले की, देशामध्ये सध्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये जनतेने मोदींची गॅरंटी नाकारली आहे. भारतीय जनता पार्टी कडून देण्यात येणारे आश्वासन यांना बळी न पडण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. जनतेला हे माहित झाले आहे की भारतीय जनता पार्टी ही जुमला पार्टी आहे. त्यामुळे ४ जून नंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असे महेश तपासे म्हणाले.

तपासे पुढे म्हणाले की लोक पुन्हा एकदा नेहरू गांधीच्या विचाराकडे वळू लागल्याने भाजपाचे धाबे दणाणले आहेत. काल देशात तिसऱ्या टप्प्याचे मतदान झालं, महाराष्ट्रात ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकांनी मतदान केलं. या ११ लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा व त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात मतदारांनी महाविकास आघाडीला पसंती दिली.

भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला लोकांनी पाठ फिरवली. इंडिया आघाडीचे सरकार येऊ शकते हे तत्वता भारतीय जनता पार्टीने मान्य केल्या असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदार मतदानाला उतरला नाही हे चित्र आपण सर्वांनी पाहिलं असेही तपासे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन