‘वेडात मराठे…’मध्ये झळकणारा महेश मांजरेकरांचा मुलगा किती शिकलाय?, वाचा सत्याच्या करिअरबद्दल

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सात मावळ्यांच्या पराक्रमावर आधारित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवरायांच्या सात वीरांमध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा मुलगा सत्या मांजरेकर (Satya Manjrekar) याचाही समावेश आहे. शिवाजी महाराजांच्या सात मावळ्यांपैकी एका मावळ्याच्या भूमिकेत असलेल्या सत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. याच सत्याबद्दल आणि त्याच्या करिअरबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसत आहे.

सत्याने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘आई’ या चित्रपटात तो दिसला होता. यानंतर सत्याने ‘जाणिवा’, ‘पोरबाजार’ या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्याने ‘फन अनलिमिटेड’, ‘१९६२ द वॉर इन द हिल्स’ आणि ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सत्याचा जन्म मुंबईतला, १९ मार्च रोजी त्याने आई मेधा मांजरेकर यांच्या पोटी जन्म घेतला. अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा म्हणून तो परिचित आहे. सत्याचे शालेय शिक्षण मुंबईच्या त्रिधा स्कूलमध्ये झाले. त्यानंतर मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजमधून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

सत्याने १९९५ मध्ये आई चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ग्रॅज्युएशननंतर, तो २००५ मध्ये वाह लाइफ हो तो ऐसी, २०१४ मध्ये पोर बाजार आणि २०१५ मध्ये जानिवा यासारख्या विविध चित्रपटांमध्ये दिसला. महेश माजरेकर दिग्दर्शित एफयू : फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटात त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. यावेळी आकाश ठोसर आणि संस्कृती बालगुडे यांनी त्याच्यासोबत काम केले आहे.