Loksabha Election | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार मूल्यांसाठी भाजप सरकार घालवा,आंबेडकरवादींचे आवाहन

Loksabha Election | लोकसभेची ही निवडणुक आपल्या अधिकारांची व अस्मितेची आहे असे मानून नरेंद्र मोदींच्या गॅरंटीचा धोका लक्षात घ्यावा. आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधीजी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार मूल्यांसाठी भाजप सरकार घालविणे हे परमकर्तव्य आहे, असे आवाहन आंबेडकरवादी, साहित्यिक व विचारवंतांनी केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जेष्ठ नेते व उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचे वास्तव, देशातील लोकशाही व संविधान समुळ नष्ट करण्यासाठी भाजपा (Loksabha Election) पक्ष उतावीळ झाला आहे अशी चिंता व्यक्त करण्यात आली. सर्वसामान्य जनता म्हणजेच दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक तसेच शेतकरी, कामगार, महिला व बेरोजगार यांच्या मुलभूत हक्कांना पायदळी तुडविले जात आहे. ब्रिटिश साम्राज्यशाही विरुध्द झालेल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतेही योगदान दिले नाहीच परंतु ब्रिटिशांना सहाय्य होईल अशीच भुमिका घेतली ते भाजप व आरएसएसचे सरकार एका हुकूमशहाला जन्माला घालत आहे. एकाधिकारशाही हा त्यांच्या विचार सरणीचा पाया राहिला आहे. युध्दाच्या खाईत घेऊन जाणारा हिटलर हा त्यांचा आदर्श आहे. अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींची गँरेंटी म्हणजे बहुमताच्या जोरावर स्वायत्त असलेल्या न्यायपालिका, निवडणुक आयोग, ईडी,  सीबीआय व पोलीस यंत्रणा यांना अंकीत करणे आणि बंधुत्व, समता,  न्याय मोडीत काढणे आहे. संवैधानिक असलेले अधिकार धोक्यात आलेले आहेत म्हणजेच सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा, भावना व मागण्यांचा चुराडा करणे होय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन