भाजपचा महाविकास आघाडीला धोबीपछाड; धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार पराभूत

मुंबई – राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल (Maharashtra Rajya Sabha Election 2022result ) जाहीर झाला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे.

कुणाला किती मते मिळाली ?- प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43, इम्रान प्रतापगढी – काँग्रेस – 44, पियुष गोयल – भाजप – 48, अनिल बोंडे- भाजप- 48, संजय राऊत- शिवसेना – 41, धनंजय महाडिक – भाजप. (Praful Patel – Nationalist Congress – 43, Imran Pratapgadhi – Congress – 44, Piyush Goyal – BJP – 48, Anil Bonde – BJP – 48, Sanjay Raut – Shiv Sena – 41 , Dhananjay Mahadik – 41.56BJP.) .

महाविकास आघाडीचं पुरेसं संख्याबळ असताना देखील अनेक मतं फोडून भाजपने धनजंय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणलं. राज्यसभेसाठी पहिल्या पसंतीची मतं घेऊन प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पियुष गोयल, अनिल भोंडे, इम्रान प्रतापगडी विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात लढत झाली. त्यात महाविकास आघाडीची पाच मते फुटल्याचे प्राथमिक दिसून येत आहे.