Manoj Jarange Patil यांनी टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा बदलू नये, बच्चू कडूंचा सल्ला

Manoj Jarange Patil: ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आक्रमक झाले आहेत. ओबीसीतून आरक्षण द्यावे तसेच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत असतानाच सरकारमधील मोठ्या नेत्यांवर विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाची दिशा बदलवत टोकाचे पाऊल उचलू नये, असा सल्ला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनातून प्रचंड मोठी उंची तयार केली आहे. ते आता केवळ एका गावापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांच्या मागे करोडो लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी अचानक असे हतबल होऊन उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे निघावं आणि अशी अतिशय टोकाची भूमिका घ्यावी, हे चुकीचे असल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले.

त्यांनी घेतलेला निर्णय हा मागे घ्यावा. हा निर्णय समाजासाठी देखील चांगला नाही. शिवाय त्यातून चुकीचा संदेश समाजात जाईल. त्यांनी आतापर्यंत या प्रामाणिकपणे आंदोलनाच्या माध्यमातून जे मिळवलं, त्याला कुठे डाग लागता कामा नये. त्यामुळे माझा त्यांना सल्ला राहील की त्यांनी या पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊ नये. असे देखील बच्चू कडू म्हणाले.

मनोज जरांगे पाटील असू देत किंवा देवेंद्र फडणवीस असू दे, प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. आपण कुणाचाही जीव घेण्यासाठी हे आंदोलन उभं केलं नाही. मला असं वाटतं, या आंदोलनातून काय चांगला मार्ग काढता येईल, त्यासाठी शक्य ते प्रयत्न आपण करू. मात्र जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची दिशा बदलू नये, असे देखील बच्चू कडू म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Nana Patole – १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार