Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे

Maratha Reservation – जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला काल संध्याकाळी हिसंक वळण लागलं. यावेळी मोठी गर्दी जमल्याने पोलिसांनी लाठीमार केला. तसंच संतप्त जमावानेही दगडफेक केली, यात काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारीही जखमी झाले.

दरम्यान आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची प्रामाणिक भूमिका आहे, असं सांगून नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं.

येथे वाचा आणखी बातम्या

इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज; आदित्य-L1 च्या प्रक्षेपणाची उलट गणती सुरू