मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार

Maratha Reservation – जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला काल संध्याकाळी हिसंक वळण लागलं. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. यावेळी मोठी गर्दी जमल्याने पोलिसांनी लाठीमार केला. तसंच संतप्त जमावानेही दगडफेक केली, यात काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारीही जखमी झाले.

दरम्यान आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची प्रामाणिक भूमिका आहे, असं सांगून नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(NCP President Sharad Pawar) यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. हि अतिशय संतापजनक बाब आहे . जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो. असं म्हणत पवारांनी टीकास्त्र सोडले आहे.

येथे वाचा आणखी बातम्या

इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज; आदित्य-L1 च्या प्रक्षेपणाची उलट गणती सुरू

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे