इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज; आदित्य-L1 च्या प्रक्षेपणाची उलट गणती सुरू

सूर्य आणि पृथ्वी दरम्यान पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या या सूर्याच्या L1 बिन्दु जवळच्या प्रभामंडल कक्षेत हा उपग्रह फिरणार आहे.

PSLV-C57 Aditya-L1 – भारताच्या पहिल्या सौर अभियानातील PSLV-C57 आदित्य-L1 च्या प्रक्षेपणाची उलट गणती सुरू झाली असून, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ स्थानकावरून आज सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य L1 च्या प्रक्षेपणाचं नियोजन भारतीय अवकाश अंतराळ संस्था इस्रोनं केलं आहे.

सूर्य आणि पृथ्वी दरम्यान पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या या सूर्याच्या L1 बिन्दु जवळच्या प्रभामंडल कक्षेत हा उपग्रह फिरणार आहे. या लॅग्रेंज बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला सुमारे चार महिने लागतील. L1 बिंदूभोवतीच्या प्रभामंडल कक्षेत सोडल्यामुळे, हा उपग्रह ग्रहण आणि अन्य खगोलीय घटनांच्या माध्यमातून कोणत्याही अडथळ्याशिवाय सौर घडामोडींचं निरीक्षण करू शकणार आहे.

आदित्य L1 अभियानात सौर वारे आणि सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थरांचं निरीक्षण करण्यासाठी आदित्य- L1 हा उपग्रह सात पेलोड्स वाहून नेणार आहे. इस्रोनं नागरिकांना श्रीहरीकोटा इथून PSLV-C57 प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्यासाठी नोंदणी करून आमंत्रित केलं आहे.