Devendra Fadnavis | बारामती मतदार संघातील गावांना निधी कमी पडू देणार नाही, फुरसुंगीत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द

Devendra Fadnavis | राज्यातील तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघात अवघे काही दिवस प्रचारासाठी उरले आहेत. देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये तिसऱ्या टप्यात मतदान होणार आहे. लोकसभेच्या बारामती मतदार संघातील गावांना निधी कमी पडू न देता विकास रखडलेल्या या भागाचा विकास करणार आहे. असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फुरसुंगीमध्ये झालेल्या प्रचारसभेत बोलताना सांगितले.

बारामती लोकसभा मतदार संघातील फुरसुंगी भेकराईनगर येथे महायुतीचे उमेदवार सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप जिल्हा अध्यक्ष वासुदेव  काळे, माजी आमदार अशोक टेकवडे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, मंगलदास बांदल, माजी नगरसेवक गणेश ढोरे, संदीप हरपळे आदी उपस्थित होते.

महापालिकेत समाविष्ट होऊन देखील या भागाचा आवश्यक विकास झाला नाही. येथील मिळकत कर ज्या प्रमाणात सुविधा मिळतील त्याच प्रमाणात आकारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे फडणवीस यांनी सभेत बोलताना सांगितले. कांचन कुल यांना दिलेले साडे पाच हजारांचे लीड हे डबल करून सुनेत्रा पवार यांना येथील जनता नक्कीच निवडून असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय