Ruturaj Gaikwad Wedding: सीएसकेच्या ऋतुराज गायकवाडला क्लिन बोल्ड करणारी ती कोण आहे?

Ruturaj Gaikwad Wedding : चेन्नई सुपर किंग्ज आणि भारतीय संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल २०२३ नंतर लग्न करणार असल्याचं समजत आहे. लग्नामुळे तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघासोबत लंडनला रवाना होऊ शकणार नसल्याचं त्यानं टीम मॅनेजमेंटला कळवलं आहे. ७ ते ११ जूनदरम्यान लंडन येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

“ऋतुराज गायकवाड याने आम्हाला त्याच्या लग्नाबाबत कळवलं. लग्नामुळे मला लंडनला लवकर निघता येणार नसल्याचं ऋतुराजने सांगितलं. पण मी टीमसोबत ५ जूननंतर जोडला जाईन, असंही ऋतुराज म्हणाला. मात्र हेड कोच राहुल द्रविड यांनी ऋतुराजच्या जागी बदली खेळाडूची मागणी केली. त्यामुळे आता यशस्वी लवकरच लंडनला रवाना होणार आहे”, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिली. यानंतर ऋतुराजची होणारी बायको कोण (Ruturaj Gaikwad Wife) आहे?, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

नवरीमुलगी कोण?

आता ऋतुराज याचं मराठी अभिनेत्री सायली संजीव हीच्यासोबत नाव जोडलं गेलं होतं. मात्र दोघांनीही आमच्यात काहीच नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ऋतुराजने वर्षांपूर्वी माझी विकेट फक्त बॉलरच घेऊ शकतो, अशी इंस्टा स्टोरी शेअर केली होती.

तर सायलीने एका मुलाखतीत आम्ही दोघे मित्र होतो. पण या सर्व चर्चांमुळे बोलणंही बंद झालंय. तसेच ऋतुराजचं दुसऱ्याशी लग्न होईल किंवा माझं दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीबरोबर लग्न होईल तेव्हा या चर्चा बंद होतील, असं सायलीने म्हटलं होतं. त्यामुळे आता ऋतुराजला नक्क कोणी बोल्ड केलंय, हा प्रश्न उपस्थित होतोय.

अशातच एका नवीन नावाची चर्चा सुरू झाली आहे. ऋतुराजची मैत्रीण उत्कर्षा ही त्याची प्रेयसी असल्याचे समजत आहे. गेल्या वर्षी ते एका जिममध्ये एकत्र दिसले होते. त्यामुळे ऋतुराजला क्लिन बोल्ड करणारी उत्कर्षाच तर नव्हे का, असा अंदाज चाहते वर्तवत आहेत. मात्र उत्कर्षा सोशल मीडियापासून दूर राहते आणि ऋतुराजनेही तिच्यासोबतचे फोटो ऑनलाइन पोस्ट केलेले नाहीत. मात्र ते दोघे कथितपणे काही वर्षांपासून एकत्र आहेत.