Baramati LokSabha | बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या तुलनेत सुनेत्रा पवार यांचे पारडे जड, ही आहेत त्यामागची कारणे

बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण ही निवडणूक पवार कुटूंबियांच्या घरातील म्हणजेच नणंद सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरूद्ध भावजय सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी आहे. पूर्वी येथे शरद पवार यांचा उमेदवार म्हटला की तोच निवडून येणार, अशी खात्री होती. मात्र आता अजित पवार वेगळे झाले असून राष्ट्रवादी कॉँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह देखील त्यांच्या कडेच आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळी राजकीय गणीतच बदललेली आहे. त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा उभ्या राहिलेल्या सुनेत्रा पवार यांना दौंड, इंदापूर परिसरात भरघोस मताधिक्य मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघातील २०१९ च्या निवडणुकीचा निकाल बघता राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणाऱ्या सुप्रिया सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात भाजपाच्या कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० मते मिळाली होती. सुळे यांनी कुल यांच्यावर फक्त १ लाख ५५ हजार ७७४ मतांनी मात केली होती. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे. त्यातच अजित पवारांसोबत रमेश थोरात, राहुल कुल आणि हर्षवर्धन पाटील आहेत. त्यांच्या एकत्र ताकदीमुळे या मतदारसंघांत सुळे यांना फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच दौंड आणि इंदापूर या दोन्ही मतदारसंघांत सुनेत्रा पवार यांचा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून थेट संपर्क असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांतून सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गेल्या निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना अवघ्या ९ हजार ६८१ मतांची आघाडी मिळाली होती. तुलनेने शहरी असलेल्या खडकवासला मतदारसंघातून भाजपाच्या मतदारांच्या माध्यमातून कुल यांनी ६५ हजार ४९४ मतांची आघाडी मिळविली होती. भाजपाचा हा मतदार यावेळी सुनेत्रा पवार यांना मदत करेल, हे स्पष्ट आहे. अजित पवारांचा गावोगावी असणारा संपर्क, राजकारणावर असलेली पकड आणि महायुतीची मिळालेली साथ यामध्यमातून सुनेत्रा पवारांना चांगला फायदा होऊ शकतो राजकीय असे विश्लेषकांचे मत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन