मी अजिबात भेदभाव केला नाही; अजितदादांची सारवासारव 

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. त्यानंतर चोवीस तासातच शिंदे सरकारने शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का दिला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान करणारे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आमदार संतोष बांगर (Santosh Bangar, MLA of Kalamanuri in Hingoli) हेही शिंदे गटात सामील झाले आहेत.

संतोष बांगर हे कालपर्यंत शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या बाजूने मतदान दिले होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत संतोष बांगर दिसल्याचे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. थेट मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांसोबत आज विधानभवनामध्ये विजयी झाल्याच्या संकेत दर्शवत बांगर यांनी प्रवेश केला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीच शिवसेनाला हा धक्का बसलाय.

यावेळी आमदार अजित पवार (MLA Ajit Pawar) यांनी जोरदार भाषण केले. ते म्हणाले, भाजपाने शिवसेनेसोबत राहून त्यांची ताकद वाढवली. प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम करत असतो. आघाडी असली तरी एकनाथ शिंदे त्यांच्या गटाची ताकद वाढवण्यावर भर देतील, फडणवीस त्यांचा पक्ष वाढवण्यावर भर देतील.

मी आजपर्यंत महाराष्ट्रातील लोकांना कुणाला बोललो नव्हतो. मात्र, आज मला सांगायचं आहे की भाजपासोबत गेल्यावर महाविकासआघाडी अनैसर्गिक आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला असा पाढा वाचण्याचं काम केलं. वास्तविक देवेंद्र फडणवीस व भाजपाच्या इतर सर्व नेत्यांना माहिती आहे की मी काम करताना असा भेदभाव सहसा करत नाही. मी अर्थमंत्री असताना १ कोटी आमदार निधी मी २ कोटी केला. आघाडी सरकार आल्यावर ३ कोटी केला. दुसऱ्या वर्षी ४ कोटी, आता ५ कोटी केला. अजिबात भेदभाव केला नाही. २८८ आमदारांना सर्व पैसे मिळाले पाहिजे.