आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाच्या गाडीला भीषण अपघातात  

सांगली – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichnd padalkar) यांचे बंधू  आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर (bramhanand padlkar ) यांच्या गाडीला भीषण अपघात (car accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघात ब्रम्हानंद पडळकर गंभीर जखमी झाले असून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला सांगली जिल्ह्यातील विटा-कुंडल रोडवर अपघात झाला. कार्यकर्त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असतानापिकअप आणि पडळकर यांच्या गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ब्रह्मानंद पडळकर ड्रायव्हर सह तिघेजण गंभीर जखमी झाले आहे.

ब्रम्हानंद पडळकर यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअप गाडीतील चालकही जखमी झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.