Hemant Godse: नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला, हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर

Hemant Godse : नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ हे नाव सर्वाधिक चर्चेत होते. परंतु त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवण्यात आल्याने महायुतीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून भुजबळ यांनी लोकसभेतून माघार घेतली होती. त्यानंतर अखेर आज लोकसभा निवडणूक २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

हेमंत गोडसे हे 2007 मध्ये मनसेकडून जिल्हा परिषद सदस्य होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून राज्यात सर्वाधिक मत मिळालेला उमेदवार अशी त्यांची ओळख आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी छगन भुजबळ यांचा 1 लाख 87 हजार मतांनी केला दारुण पराभव केला होता. तर 2019 च्या निवडणुकीत समीर भुजबळ यांचाही 2 लाख 92 हजार मतांनी पराभव करत पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणार हार्दिक पांड्या

Anis Sundke | हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुलमानांचा सुद्धा, अनिस सुंडके यांचे प्रतिपादन

शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर यांना उमेदवारी