काल अजित पवारांना पाठिंबा अन् आज अमोल कोल्हे शरद पवारांसोबत; म्हणाले, ‘बाप नाही विसरायचा’

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याप्रमाणेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत काल शिवसेना-भाजपशी हात मिळवला. राजभवन येथे आपल्या ९ समर्थकांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या भूमिकेवर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काल अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज अमोल कोल्हे यांनी मी शरद पवार (Sharad pawar) यांच्यासोबत असल्याचं म्हंटलं आहे.

अमोल कोल्हे शरद पवारांसोबत आहेत, असं त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे शरद पवारांना भेटणार आहेत. मी शरद पवारांना भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.