Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाला पाठींबा देत कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी घेतला मोठा निर्णय

Indurikar Maharaj Big Decision For Maratha Reservation: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) विषय सर्वाधिक चर्चेत आहे. अंतरवली सराटी येथे गेल्या ६ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणांची संख्या वाढत चालली आहे. शिवाय राजकीय नेत्यांच्या राजीनाम्याचे सत्रही सुरू झाले आहे. अशातच  प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Maharaj Indurikar) यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी मराठा आंदोलनाला पाठींबा देताना मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून 5 दिवस कोणतेही कार्यक्रम न करण्याचा आणि कीर्तन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून इंदुरीकर महाराज यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांचे उद्यापासून ते पाच दिवसापर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.

महत्वाच्या बातम्या-
‘आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा आणि जरांगे पाटलांची प्रकृती व्यवस्थित राहावी हीच अपेक्षा’

दुर्दैवाने जरांगे पाटलांच्या जीवाला काही धोका झाला तर….; रोहित पवारांचा सरकारला इशारा

कुणाच्याही ताटातलं न काढता मराठ्यांना आरक्षण द्या; शरद पवारांची आक्रमक मागणी