नरेंद्र मोदींच्या वक्तव्यांचा महाराष्ट्राच्या अपमानाशी संबंध काय ? – चित्रा वाघ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. नरेंद्र मोदींच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी काल प्रत्युत्तर दिल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेलं मत कॉंग्रेसच्या भुमिकेविषयी होतं. त्यांनी मांडलेल्या मताचा आणि महाराष्ट्राच्या अपमानाचा संबंध काय आहे ? अनिल देशमुख वसुलीकांड, अँटीलीया बॉम्ब प्रकरण, महिलांवर होणारे बलात्कार यात महाराष्ट्राची मान देशपातळीवर खाली गेली आहे. त्याचं दु:ख आपल्याला झालेलं दिसलं नाही का ? असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

काँग्रेसवर निशाणा साधत कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशभरात कोरोनाचा प्रसार वाढविण्यात कॉंग्रेस जबाबदार आहे. महाराष्ट्रातून देखील मजूरांनी भरलेल्या श्रमिक ट्रेन उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड राज्यात पाठवल्या. त्यामुळेच कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. असा आरोप नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर केला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी काल पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत गुजरात राज्यातून सर्वाधिक ट्रेन बाहेर पाठवल्या. याची माहिती केंद्र सरकारनेच दिली आहे. त्यामुळे त्याबाबत त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे.