Sunil Tatkare | दापोली मतदारसंघात तुम्हाला अभिप्रेत असणारे काम प्रामाणिकपणे करेन

Sunil Tatkare | दापोली – आगरवायंगणी – या मतदारसंघात तुम्हाला अभिप्रेत असणारे काम प्रामाणिकपणे महायुतीचा खासदार म्हणून करेन असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आगरवायंगणी येथील प्रचार सभेत जनतेला दिला.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या देशात पहिल्यांदा संविधान दिन साजरा करण्याचे ऐतिहासिक काम झाले आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. नऊ वेळा मतदारसंघात मतदान न करणारा म्हणून अनंत गीते यांची नोंद झाली आहे हे सत्य आहे असा जोरदार टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.

७ मे रोजी घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आणि चार महिन्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या धनुष्यबाण चिन्हावर काम करण्यासाठी आणि उमेदवाराला निवडून आणण्यासाठी स्वतः फिरणार आहे असा शब्द सुनिल तटकरे यांनी देतानाच मापात खोट कधीच नसणार असा विश्वासही दिला.

दाभोळ जिल्हा परिषद गटातील आगरवायंगणी येथे महायुतीची प्रचार सभा पार पडली.

या जाहीर प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम, माजी आमदार सुर्यकांत दळवी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शंकर कांगणे,आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा