Sunil Tatkare | बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना- भाजप सोबत असल्यामुळे निवडणुकीत यश हमखास मिळणार

Sunil Tatkare | समाजाच्या नावावर आणि शिवसेना या चार अक्षरावर अनंत गीते तुम्हाला यश मिळाले परंतु आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना आणि भाजप माझ्यासोबत आहे त्यामुळे या निवडणुकीत यश हमखास मिळणार असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे ( Sunil Tatkare) यांनी फणसू येथील महायुतीच्या प्रचार सभेत व्यक्त केला.

काही गोष्टी विधीलिखित असाव्या लागतात. अनंत गीते तुम्ही सत्तेसाठी मंत्री होतात मी मात्र सत्तेत सेवा करण्यासाठी आलो आणि ती सेवा करण्याची संधी मिळाली आणि कुणबी समाजाला पाच कोटी रुपये अजितदादा पवार यांच्याकडून मिळवून दिले याची माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.

१६ व्या खासदारकीचा अडीच कोटी रुपयांचा निधी अनंत गीते खर्च करु शकले नाहीत. खासदार निधीसुध्दा वापरता येत नाही असा निष्क्रिय खासदार लाभला असून निष्क्रियतेविरुद्ध सक्रियतेची लढाई आहे असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

पहिल्यांदाच घड्याळ चिन्हावर मतदान करणार आहात. यावेळी खासदारकीसाठी धनुष्यबाण ऐवजी घड्याळ चिन्ह असणार असून चार महिन्याने धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून विधानसभेसाठी आमदार योगेश कदम यांना विजयी करण्याचे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.

धर्म – जात यामध्ये गल्लत करत काही शक्ती पाप करत आहेत मात्र हे पाप करणारे निवडणूका संपल्यानंतर मतदारसंघात दिसणार पण नाही. परंतु आम्ही तुमच्या सेवेसाठी एटीएमसारखे उपलब्ध राहणार आहोत. कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी…राष्ट्रहितासाठी मला पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्या असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा