खासदार संजय राऊत पुन्हा एका धमका करण्याच्या तयारीत; लवकरच पत्रकार परिषद घेणार

मुंबई  :  गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमध्ये असणारे मंत्री आणि नेते यांचे घोटाळे समोर येत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या तोंडचे पाणी पळवले असल्याचे चित्र आहे. यातच आता  ईडीच्या (ed) कारवाईवरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद पेटला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanajay raut) पुन्हा एका धमका करण्याच्या तयारीत आहे. ‘खेळ नुकताच सुरू झाला आहे, लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे’ असं सूचक ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

आता केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये काही वसुली एंजट असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे याबाबतचे पुरावे आपण पंतप्रधान कार्यालयास दिल्याचेही त्यांनी म्हटलंय. ‘ जे काही पुरावे दिले आहे. अधिक तपशील शेअर करण्‍यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे’ असं संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊत आता काय खुलासा करणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

दरम्यान, राऊत हे एका बाजूला असा इशारा देत असताना दुसऱ्या बाजूला अंमलबजावणी संचालनालयाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून डिसेंबर महिन्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (Maharashtra State Cooperative Bank) साखर कारखान्यांच्या (Sugar Factory) घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल नऊ तास त्यांची चौकशी (Inquiry) झाली होती. त्यानंतर आज ईडीकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. यावेळी तनपुरेंची एकूण 13 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.