काकांच्या या फटक्यानंतर तरी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय रद्द करावा – वागळे

Mumbai – ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Sharad Pawar Announced Retirement) देत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. शरद पवारांनी हा निर्णय घेऊ नये यासाठी सर्वच नेत्यांनी त्यांना गळ घातली. यानंतर आता शरद पवार हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर फेरविचार करणार असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यातच आता जेष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून अजित पवारांची चांगलीच कानउघडणी केली आहे. काकांच्या या फटक्यानंतर तरी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय रद्द करावा. भाजपसोबत गेल्यास विश्वासार्हता नष्ट होईल आणि राजकीय आत्महत्या ठरेल. भाजपची वापरा आणि फेका ही नीती आहे. असं वागळे यांनी म्हटले आहे.