Supriya Sule | आयुष्यात पैसा नाही तर नाती महत्वाची असतात, सुप्रिया सुळेंचे भावनिक वक्तव्य

Supriya Sule | आमच्या घरातील गोष्टी रोज टीव्हीवर दिसतात, अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत पण देणार नाही. अनेक महिने झालं सहन करत आहे, आता जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका. माझ्या आणि रोहितच्या आईवर दोनवेळा बोलला ठीक आहे, तिसऱ्या वेळी बोलला, तर करारा जवाब मिलेगा असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रतिभाताई पवार, सुनंदाताई पवार, शर्मीलाताई पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्षा भारतीताई शेवाळे, आमदार रोहित पवार, बारामती तालुकाध्यक्षा वनिताताई बनकर, इंदापूर तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, दाैंड तालुकाध्यक्षा योगिनीताई दिवेकर, पोर्णिमाताई तावरे, शिवव्याख्याते शिवरत्न शेटे, सक्षणाताई सलगर, प्रियंकाताई शेंडकर, विकास लवांडे, संगीताताई ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ बारामती येथे आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित महिलांशी संवाद साधताना आयुष्यात पैसा नाही तर नाती महत्वाची असतात, त्यातही नाते तोडण्यापेक्षा ते नाते जपणे जास्त अवघड असते, असे सांगितले. सुनंदा वहिनींंमध्ये मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असे तिन्ही गुण आहेत, पण काहीजण याचे भान न ठेवता टिका करतात, हे दुर्देवी असल्याचे सांगितले. माझ्या कुटुंबांवर आज टिका केली जात आहे. त्या टीकेची उत्तरे माझ्याकडे आहेत, पण मी ते देणार नाही, कारण माझ्यावर नाती जपण्याचे संस्कार झाले आहेत. पण मी उत्तर देत नाही म्हणून त्याचा अतिरेक करु नका, नाही तर सहनशीलतेलाही मर्यादा असते, त्यामुळे परत टिका कराल तर ‘करारा जवाब’ मिळेल असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

पुढे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, काश्मीर ते कन्याकुमारी पक्ष आहे त्यांना एक उमेदवार मिळत नाही. आमच्या घरात उमेदवारी दिली. आमचं घर फोडत निर्णय घेतला. बदल तिकडे हाजी करून होणार नाही. मी तुमच्यासाठी लढणार असल्याचे त्या म्हणाल्या. आमच्या खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही. बारामती म्हणजे शरद पवार साहेब असून दुसऱ्यांनी गैरसमज करू नये हे सगळं आमच्यामुळे आहे. विकास सगळ्यांच्या मदतीने होतं असतो कामे फक्त सत्तेतून होतात असे सांगितले जाते, १० वर्ष विरोधात खासदार आहे अनेक प्रकल्पात देशात बारामतीचा पहिला नंबर लागतो. वाराणसीपेक्षा बारामती सगळ्यात पुढं आहे असेही सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय