Raj Thackeray : आज पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार, मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सभा होणार

Raj Thackeray In Pune : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारांचा धडाका सुरू केला आहे. आता राज ठाकरे यांची पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासाठी जाहीर सभा होत आहे.

पुण्यात महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते आमदार रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यातच राज ठाकरेंची साथ सोडत वंचितकडून वसंत मोरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. अशातच मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे यांची येत्या आज संध्याकाळी ६ वाजता पुण्यातील सारसबाग परिसरात सभा आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेस कोर्स वरती भव्य अशी सभा पार पडली. यावेळी पुणेकरांनी मोदींच्या सभेला भरभरून प्रतिसाद दिला. अशातच आता मोहाळांसाठी राज ठाकरे पुण्यात येत आहेत. त्यामुळे पुणेकर राज ठाकरेंच्या सभेला किती प्रतिसाद देणार. ते ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर विरोधकांवर राज ठाकरे कशा पद्धतीने हल्लाबोल करणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती