‘हा पार्थ पवार म्हणजे पुण्याचा पेंग्विन’

पुणे : मावळ लोकसभा मतदार संघ नक्की कोणाचा शिवसेनेचा की राष्ट्रवादीचा यावरून आता महाविकास आघाडीत रणकंदन सुरु झाले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा. अशी मागणी कार्यकर्त्याने केली आहे.

पार्थ पवार यांनावाढ दिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने ही पोस्ट लिहिली आहे. कार्यकर्त्याची ही पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. २०१९ची लोकसभा पार्थ पवार यांनी मावळ मधून लढवली होती. मात्र त्यात त्यांना शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर मावळबाबतच्या विविध घटनानावर पार्थ पवार आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम भाष्य करत असतानाही दिसतात.

यावरून आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पार्थ पवार यांना टोला लगावला आहे. ‘पार्थ पवार हेलिकॉप्टरने फिरण्या पलीकडे काही करत नाही, हा पुण्याचा पेंग्विन आहे. असं असले तरी पिंपरी चिंचवड लोकसभा सीट राष्ट्रवादी ढापणार आणि शिवसेनेच्या बरणेंना घरी पाठवणार’. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.