पाकिस्तानात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार, कुटुंबियांकडून कबरींवर लोखंडी जाळी आणि कुलुप?

पाकिस्तानमध्ये पालक आपल्या घरातील मुली आणि महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होऊ नये म्हणून कबरीला कुलुप लावून ठेवत आहेत, असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. एएनआयने डेली टाईम्सच्या वृत्ताचा आधार घेत हे वृत्त दिलं आहे. याबाबत सोशल मीडियावरही अनेक दावे केले जात आहेत. लेखक हॅरिस सुल्तान यांनी कट्टरपंथी इस्लामिक विचारांमुळे असे प्रकार होत असल्याचा आरोप केला आहे.

हॅरिस सुल्तान यांनी आपल्या ट्वीटमध्ये पाकिस्तानमध्ये महिलांच्या मृतदेहाबरोबर बलात्कार होत असल्याचा दावा करताना म्हटलं, “पाकिस्तानने लैंगिक नैराश्य आलेल्या समाजाला जन्म दिला आहे जेथे महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होऊ नये म्हणून कबरींवर कुलुप लावावं लागत आहे. तुम्ही जेव्हा बुर्ख्याचा संबंध बलात्काराशी जोडता तेव्हा हाच बलात्कार कबरीपर्यंत येऊन पोहचतो.”

आणखी एक ट्विटर वापरकर्ता साजिद युसुफ शाह यांनी लिहिले, “पाकिस्तानने निर्माण केलेल्या सामाजिक वातावरणामुळे लैंगिक आरोप आणि दडपशाहीचा समाज निर्माण झाला आहे, जिथे काही लोकांनी लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या मुलीच्या कबरीला कुलूप लावले आहे. बलात्कार आणि एखाद्या व्यक्तीच्या कपड्यांमधील असा संबंध केवळ दुःख आणि निराशेने भरलेल्या मार्गाकडे नेतो. ”

यापूर्वीही पाकिस्तानात अनेक वेळा महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि त्यांची विटंबना करण्यात आली आहे.

https://youtube.com/shorts/PK29zPduO_I?feature=share