Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Muralidhar Mohol | शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग एमएसएमई आणि स्टार्टॲप्सच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले मंडई, गाडीखाना, खडकमाळ आळी, कस्तुरे चौक, कृष्णाहट्टी चौक, लोहियानगर, मीठगंज पोलीस चौकी परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

मोहोळ म्हणाले, “एमएसएमई आणि स्टार्टअप क्षेत्राची क्षमता वाढवून शहराला देशात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. स्वतंत्र विमानतळ, पायाभूत सुविधांची निर्मिती, किफायतशीर औद्योगिक वीजदर, मुबलक पाणी, कुशल मनुष्यबळ, मोक्याची जागा, सुरळीत वाहतूक आदी उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करू. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी नियमित संवाद साधणार आहे.”

मोहोळ पुढे म्हणाले, “आयटी हबला बूस्टर मिळावा यासाठी धोरण आखणार आहे. आयटी हबमुळे बांधकाम क्षेत्रापासून लॉन्ड्री, मेसपर्यंत छोट्या-मोठ्या व्यवसायांतून रोजगार निर्मिती होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. राज्याच्या दरडोई उत्पन्नात 18 टक्के वाटा पुणे शहराचा आहे. उद्योग, सेवा आणि व्यावसायिकांना उपयुक्त ठरेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच निर्यात वाढीसाठी जिल्ह्याचा आराखडा तयार करणार आहे.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर

Devendra Fadnavis | आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल

Shirur LokSabha | कोल्हे कवडीचं काम करत नसेल तर जनता त्यांना कवडीमोल करेल, दरेकरांनी साधला निशाणा