World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत

World Cup 2023 Finalist: विश्वचषक 2023 हळूहळू आपल्या समारोपाकडे वाटचाल करत आहे. साखळी टप्प्यातील सर्व सामने रविवारी संपतील. भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीचे तिकीट आधीच निश्चित केले आहे.

मात्र, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील चौथा संघ कोण असेल? हे शनिवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या निकालावरून कळेल. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भिडणाऱ्या दोन संघांची नावे सांगितली आहेत.

डिव्हिलियर्सने भाकीत केले
एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, विश्वचषक 2023चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात होणार आहे. यावेळी दक्षिण आफ्रिका चोकर्सचा डाग धुण्यात यशस्वी होईल आणि टीम इंडियाचा पराभव करून विजेतेपद मिळवेल, असा विश्वास मिस्टर 360 ला आहे.

डिव्हिलियर्स म्हणाला, “मी या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे. माझ्या मते, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल. मात्र, मी त्या रात्री सामना पाहणार नाही, पण शांतपणे झोपणे पसंत करेन.” यावेळी दक्षिण आफ्रिकेला पहिले विजेतेपद जिंकण्यात यश मिळेल, अशी आशा असल्याचे डिव्हिलियर्सने सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर