देशभक्ती असावी तर अशी; इस्रायलच्या माजी पंतप्रधानांनीही हाती बंदूक घेत सांभाळला मोर्चा  

Naftali Bennett – इस्रायल आणि हमास (Israel vs Hamas) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज तिसरा (Israel-Hamas War) दिवस आहे. या युद्धात 970 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 2000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ज्यामध्ये 600 हून अधिक इस्रायलींना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांचे अपहरण करण्यात आले आहे. इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्यात 370 लोकांचा मृत्यू झाला असून 2200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, हमासच्या सैनिकांनी गाझा पट्टी आणि दक्षिण इस्रायलमध्ये अनेक इस्रायली नागरिक आणि सैनिकांना ओलीस ठेवले आहे, त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या 17 स्थानांवर आणि 4 मुख्यालयांवर हल्ले केले आहेत. दरम्यान, इस्रायली लष्करानेही आपल्या राखीव सैनिकांना सक्रिय कर्तव्यावर बोलावले आहे. ज्यामध्ये देशाचे माजी पंतप्रधान नफताली बेनेट यांचेही नाव आहे. नफ्ताली यांनी आता आघाडीवर असलेल्या इस्रायली स्थानाचा ताबा घेतला आहे. आयडीएफ कॅम्पमधील राखीव सैनिकांमध्ये ते दिसत आहेत. नफ्ताली बेनेट या इस्रायली लष्करात कमांडर होता. अशा परिस्थितीत त्यांच्या सैन्यात भरती झाल्याने इस्रायलला सकारात्मक संदेश गेला आहे.

खरे तर इस्रायलच्या सर्व नागरिकांना सैन्यात सेवा देणे बंधनकारक आहे. या कारणास्तव, इतर अनेक राजकारणी देखील इस्रायली सैन्याच्या संबंधित युनिटमध्ये सामील झाले आहेत.  नफताली बेनेट यांच्या या देशभक्तीचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

IND Vs AUS : कांगारूंची शिकार करत विश्वविजयाची भारताने केली सुरुवात; कोहली-राहुलची अप्रतिम कामगिरी

Ravindra Dhangekar : काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीला जाणं रविंद्र धंगेकरांनी टाळलं? समोर आलं मोठं कारण

सिक्कीमच्या ढगफुटीत बीडचा जवान शहीद; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार