Prakash Ambedkar | नितेश राणे वेडा आमदार, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar – आमच्याच राज्यात पोलीस आमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत. त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? असे वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले होते. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नितेश राणेंच्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याला फार महत्त्व देऊ नये, असे म्हणत आंबेडकरांनी त्यांचा उल्लेख ‘वेडा आमदार’ असा केला.

अकोल्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, त्यांच्या वक्तव्यामुळे काही फरक पडणार नाही. पोलिसांनी आणि जनतेनेही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, असे सांगत आंबेडकरांनी नितेश राणे यांचा उल्लेख ‘वेडा आमदार’ असा केला. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर कारवाई होऊ शकते. पण माझ्या मते पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करावे. एक वेडा आमदार बोलला असे समजावे. त्याच्या या वक्तव्यामुळे समाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे ही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप