MNS-BJP alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?

MNS-BJP alliance – लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. अशातच आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेऊन तासाभराहून अधिक वेळ चर्चा केली. या भेटीनंतर राज ठाकरे लवकरच महायुतीचे (MNS-BJP alliance) भागीदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीत समावेशाने ‘मनसे’ला राज्यात दोन जागाही मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर ‘मनसे’कडून वर्धापनदिनाच्या माध्यमातून नाशिक लोकसभा निवडणुकीचे (Nashik Lok Sabha Elections) रणशिंग फुंकले जाणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकपुरतेच ‘मनसे’चे अस्तित्व असल्याने आता मनसेने या शहरांसह नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसेकडून नाशिकची जागा लढविण्यासाठी चाचपणी सुरु आहे. भाजप-शिंदे गटाशी जवळिकीमुळे मनसेच्या महायुतीत समावेशाची चिन्हे दिसू लागली आहेत. सध्या महायुतीत मनसेला दोन जागा मिळणार असल्याची चर्चा असून यापैकी नाशिकची एक जागा पक्की असल्याच्या चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार