Rupali Chakankar | पुणेकरांनीच निवडणूक हातात घेतली असून मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित

Rupali Chakankar | लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. पुण्यात तिरंगी लढत होत असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यापेक्षा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे पारडे जड दिसत आहे. दरम्यान राष्ट्रवदी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)  यांनी मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, पुणे लोकसभेच्या बाबतीत उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड गर्दी झाली होती. पुणेकर फार चोखंदळ आहेत, ते सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत. पण मुरलीअण्णांनी कोरोना काळात जे काही काम केलं त्या कामाची उतराई म्हणून इतक्या उन्हातही पुणेकर रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे पुण्याची निवडणूक आता पुणेकरांनीच हातात घेतली असून मुरलीअण्णांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन