Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश  

Lok Sabha Elections 2024 : भाजप फेब्रुवारीच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. या यादीत जवळपास 100 उमेदवारांची नावे असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने समोर आले आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक त्या जागा असतील ज्यात २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) पक्षाचा पराभव झाला होता . उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 14 जागांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय भाजप तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, पंजाब, जम्मू-काश्मीर, ओडिशा आणि महाराष्ट्रातील गमावलेल्या जागांवर उमेदवार उभे करू शकते.

भाजपने आधीच अशा 160 जागा निवडल्या आहेत, ज्यामध्ये एकतर भाजप जिंकू शकला नाही किंवा फार कमी फरकाने प्रभाव झाला. या जागांवर भाजपने सुमारे वर्षभरापूर्वी क्लस्टर प्रभारी नेमून काम सुरू केले आहे. अशा 160 जागांपैकी सुमारे 100 जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. भाजप कोणत्याही दिवशी या उमेदवारांची नावे जाहीर करू शकते.

यंदाच्या लोकसभा निवडणुका एप्रिल-मे 2024 मध्ये होणार आहेत, त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी तीव्र केली आहे, मात्र उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात भाजप आघाडी घेऊ शकते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने असेच केले होते.

राजकीय विश्लेषकांचे मत आहे की यादी आधी जाहीर केल्याने उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळतो. अशा उमेदवारांची तिकीट मिळवण्याची चढाओढ संपते आणि ते प्रचाराला लागतात. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजप हा फॉर्म्युला अवलंबत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनेही देशभरातील छोट्या पक्षांसोबत युती केली आहे. लोकसभेच्या 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये आरएलडीसोबत युती केली आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशात ओमप्रकाश राजभर आणि अनुप्रिया पटेल यांच्या पक्षाशी युती आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार