सत्तारांचं हनुमानाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई – सध्या अनेक मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठणाच्या विषयावरून वातावरण आणखी चिघळलं आहे. दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. यात त्यांनी एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रभु हनुमानाबद्दल आक्षेपार्ह केला असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सत्तार यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे. नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा 2017 मधील जुना व्हिडीओ व्हायरल करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सत्तार यांनी या व्हिडीओमध्ये प्रभू हनुमानाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देत म्हटलं आहे की, हिंमत असेल तर हनुमानाचा अपमान करणाऱ्या अब्दुल सत्तारांना अटक करा, असं म्हटलं आहे. नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अब्दुल सत्तार यांच्या जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपकडून अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.