Amol Kolhe | डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

Amol Kolhe | लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण पाच सभा होणार आहेत. शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी, जुन्नर या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक सभा होणार आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ, सभांचे नियोजन

शिरूर – हवेली विधानसभा
२८ एप्रिल – उरळीकांचन, या. हवेली
जुन्नर विधानसभा
३० एप्रिल – ओतूर बाजार, ता. जुन्नर
हडपसर विधानसभा
६ मे – कात्रज
भोसरी विधानसभा
७ मे – मा. आदित्य ठाकरे यांची रॅली
आंबेगाव – शिरूर विधानसभा
८ मे – रांजणगाव, ता. शिरूर
खेड – आळंदी विधानसभा
१० मे – चाकण बाजार समिती आवार

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन