बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार जया प्रदा यांना ६ महिन्यांचा तुरुंगवास, पण काय आहे कारण?

बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार जया प्रदा (Jaya Prada) सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहेत. या प्रकरणी त्यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा आणि 5000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी त्यांनी कामगार शासकीय विमा महामंडळाकडे दाद मागितली होती, मात्र त्यानंतरही न्यायालयात खटला दाखल होऊन न्यायालयाने तो फेटाळला होता. यानंतर जया प्रदा यांना न्यायालयाकडून दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, याबाबत अभिनेत्रीच्या कायदेशीर टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने चेन्नईच्या रायपेटमध्ये असलेल्या थिएटरच्या कामगारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यादरम्यान थिएटरमधील कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले जात नसल्याची तक्रार केल्याचे प्रकरण समोर आले होते. याची माहिती थिएटर व्यवस्थापनाला आधीच होती. पैसे न दिल्याने कर्मचाऱ्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली.

वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, असे म्हटले जात आहे की जया प्रदा यांनी कर्मचार्‍यांची थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले होते. हा खटला फेटाळण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाकडे केली. पण, चेन्नई न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळले. यात चिंतेची बाब म्हणजे थिएटर बंद पडले असून, त्यांच्या पगारातून कापलेला ईएसआयही दिला गेला नाही. त्याच बरोबर सरकारी विमा महामंडळालाही पैसे दिले नसल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. हे प्रकरण कर्मचाऱ्यांच्या राज्य विम्याशी संबंधित आहे.

जयाप्रदा यांच्याबाबतच्या तक्रारीवर बऱ्याच दिवसांनी सुनावणी झाली. कामगार सरकारी विमा महामंडळाच्या वकिलांनी या विषयावर आपला आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रकरणावर सुनावणी झाली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अभिनेत्रीला 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 5000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.