ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट, हवा फक्त मोदींच्या लुकचीच…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तडफदार भाषणांमुळे आणि बेधडक निर्णयांमुळे कायमच चर्चेत असतात. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांचे नवनवीन लूक देखील कायम चर्चेत असतात. मोदी साऊथला गेले कधी लुंगी नेसतात तर दुसऱ्या राज्यात गेले की तिकडचा वेश परिधान करतात, आज मात्र मोदी पुन्हा त्यांच्या हटके लुकमुळे चर्चेत आले आहेत.

प्रजासत्ताक दिनानंतर होणारी NCC रॅली दिल्लीतील करिअप्पा मैदानावर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पोहोचले, त्यांचा लूक वेगळा होता. त्यांचा हा नवा लुक सर्वांचे आकर्षण ठरला. शीख पगडी परिधान केलेल्या पंतप्रधान मोदींना एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला. ही रॅली 1953 पासून दरवर्षी आयोजित केला जाते. रॅलीत 1000 NCC कॅडेट्सच्या मार्चपास्टची सलामी घेतली. यावेळी एनसीसी कॅडेट्सनी जमिनीवर आणि हवेत आपले कौशल्य दाखवले.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडी ब्रह्म कमळसोबत काळी टोपी घातली होती, जी खूप चर्चेचा विषय बनली होती. या टोपीसोबत कुर्ता पायजमामा आणि मणिपुरी गमछा घातला होता. पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांशी मोदींच्या पेहरावाची जोड देऊन प्रजासत्ताक दिन सर्वांनी पाहिला.

आज त्यांनी शीख पगडी घातली होती. निवडणुका असणाऱ्या पाच राज्यापैकी पंजाब हेही एक राज्य आहे, त्यामुळे मोदींची पगडी पंजाबशी जोडली जात आहे. मोदी ज्या राज्यात जातात तिथला वेश परिधान करून तिथल्या लोकांची मनं जिकण्याचा प्रयत्न करतात. आता पाच राज्याच्या निवडणुका आहेत, त्यामुळे मोदी तिथल्या मतदारांना आकर्षत करण्यासाठी असे वेश परिधान करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.