‘गोव्यात काँग्रेस शिवसेनेला विचारायला तयार नाही, राऊत यांचा स्वबळाचा केविलवाणा प्रयत्न’

 मुंबई –  गेल्या काही दिवसापासून पाच राज्याच्या निवडणूकीच्या (Election 2022) तोफा वाजत आहे. शिवसेना इतर पक्षांचा आश्रय घेवून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र कोणताही मोठा पक्ष शिवसेनेला सोबत घ्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुका जरी बाहेरील राज्यातील असल्या तरी त्यांनी महाराष्ट्रातील वातावरणही तापलं आहे.

इतर राज्यातही काँग्रेसशी युती व्हावी असे खासदार संजय राऊतांकडून वारंवार बोललं जातंय. मात्र राऊत यांच्या केविलवाण्या प्रयत्नांना यश येताना दिसत नसल्याचे दिसत आहे. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर नैराश्यात गेलेल्या संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोव्यात काँग्रेसला 40 पैकी 45 जागा मिळतील असं त्यांना वाटतं. त्यामुळेच काँग्रेस आघाडी करण्यास इच्छूक नसावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान शिवसेनेच्या या फजितीवर आता भाजपने निशाणा साधला आहे. गोव्यात काँग्रेस शिवसेनेला विचारायला तयार नसल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे. अशातच संजय राऊत हे स्वबळाचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.