BSF जवानाच्या मुलीचाच बनवला अश्लील व्हिडीओ, विरोध केल्याने जवानाची हत्या

Meljibhai Vaghela : गुजरातमधून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी करणाऱ्या BSF जवानाच्या (BSF) मुलीचाच अश्लील व्हिडीओ बनवण्यात आला. याचा विरोध केल्यामुळे बीएसएफ जवानाला बेदम मारहाण करण्यात आली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.   गुजरातमधील (Gujarat) नडियाद जिल्ह्यात (Nadiad) बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. येथील एका बीएसएफ जवानाच्या मुलीच्या अश्लील व्हिडीओ बनवण्यात आला होता.  याचा जाब विचारण्यासाठी तसेच या घटनेचा विरोध करण्यासाठी आरोपीच्या घरी गेलेल्या जवानाला चक्क बेदम मारहाण करण्यात आली.(Gujrat Mob Leeching )

नडियाद पोलिसांनी सांगितले, BSF जवान मेलजीभाई वाघेला आणि त्यांचा मुलगा काही नातेवाईकांसह या घटनेतील आरोपी शैलेश जाधवच्या घरी गेले होते. यादरम्यान जोरदार हाणामारी झाली. आरोपीच्या घरी पोहोचल्यावर जवान आणि आरोपीच्या गटांमध्ये झालेल्या भांडणात आरोपीचे वडील, काका आणि इतर कुटुंबीयांनी वाघेला यांच्यावर हल्ला केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.