चंद्रपूरकरांना 200 युनिट विज मोफत द्या या मागणीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार – आ. किशोर जोरगेवार

Nagpur – चंद्रपूरकरांना 200 युनिट विज मोफत देण्यात यावे हि मागणी मी विसरलेलो नाही. कारण ही केवळ मागणी नसुन तो आमचा हक्क आहे. हक्कासाठी झालेला उठाव इतिहास घडवतो. आजची ही अधिकार बाईक रॅली चंद्रपूरच्या आंदोलनांच्या इतिहासात नोंदविली जाणार आहे. या मागणीसाठी जिवणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची माझी तयारी असुन यासाठी मी जेव्हा जेव्हा हाक देईल याच उत्साहात एकत्रित या असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी, शेतकऱ्यांना विज मोफत देण्यात यावी, रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी या मागणीसाठी आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपूर अधिवेशनावर भव्य अधिकार बाईक रॅली काढण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई (अम्मा) यांनी सदर रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर हि भव्य अधिकार बाईक रॅली नागपूरच्या दिशेने रवाना झाली. या रॅलीला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक बलराम डोडाणी, माता महाकाली महोत्सव चे अध्यक्ष अजय जयस्वाल, एमआयडीसी असोसिएशन अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, छोटा नागपूर चे उपसरपंच रिषभ दुपारे,प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सलिम शेख, युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, प्रा. श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर, नानाजी नंदनवार, सविता दंडारे, दुर्गा वैरागडे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, घुग्घुस शहर संघटक विलास वनकर, आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, राज्यात सर्वाधिक विज उत्पादन करणाऱ्या जिल्हांमध्ये चंद्रपूर जिल्हाचा समावेश आहे. जवळपास 5 हजार मेग्यावॅट पेक्षा अधिक विज आम्ही निर्माण करतो. ही औष्णिक विज आहे. त्यामुळे यातुन होणारे प्रदुषण प्राण घातक आहे. शेतीला याचे मोठे नुकसाण होत आहे. प्रदूषणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे वयोमान 5 ते 10 वर्षांनी घटले आहे. या औष्णिक विज प्रकल्पातुन होणाऱ्या प्रदुषणाची इतकी मोठी किंमत मोजत असतांनाही केवळ दोन ते अडिच रुपये प्रति युनिट रुपयात तयार होणारी विज आम्हाला 5 ते 15 रुपये प्रति युनिट या दरात विकत घ्यावी लागत आहे. जागा, पाणी, कोळसा, आमचाच आणि विजही आम्हीच महाग घ्यायची हा अन्याय आहे. या विरुध्द आम्ही पुर्ण ताकदीने संघटित होउन लढणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

या मागणीसाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. जेथे कायदे बनतात अशा अधिवेशनातही आपण हा विषय वारंवार मांडला आहे. संबंधित मंत्र्यांना सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र याला यश येत नसल्याने चंद्रपूरकरांची भावना संपुर्ण मंत्रीमंडळा पर्यंत पोहचावी यासाठी आपण आज हि बाईल रॅली नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु असतांना विधान भवनावर आणली असल्याचे ते यावेळी म्हणाले. या बाईक रॅलीत सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिल्या बदल त्यांनी यावेळी चंद्रपूरकरांचेही आभार मानले.