अयोध्येत ठाकरे कुटुंबीयांना नव्हे तर फक्त राज ठाकरेंना विरोध – ब्रिजभूषण सिंह

अयोध्या – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. बृजभूषण सिंह यांनी म्हटलं की, राज ठाकरे या एकमेव व्यक्तीचा अपवाद वगळला तर ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणाच्याही अयोध्या दौऱ्याला आपला विरोध नाही.

महाराष्ट्रातील लोकांशी अयोध्यावासी याचं कोणतंही शत्रूत्व नाही. आमचं शत्रूत्व हे फक्त राज ठाकरेंशी आहे. कारण त्यांनी उत्तर भारतीयांना अपमानित (Insulting North Indians) केले आहे. राज ठाकरे या एकमेव व्यक्तीचा अपवाद वगळला तर ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणाच्याही अयोध्या दौऱ्याला आपला विरोध नाही. जर राज ठाकरे यांचं कुटुंब, त्यांची आई-मुलगा कोणीही येऊ दे… त्यांचं स्वागत आदरातिथ्य माझ्या घरी करेन. पण राज ठाकरेंना विरोध राहणार आहे, असंही ब्रिजभूषण यांनी म्हटलंय.