Loksabha ELection | शिक्षण, रोजगार, बेकारी भत्ता देण्यात डबल इंजिन’ अयशस्वी, इंडिया आघाडीच्या नेत्यांची टीका

Loksabha ELection | डबल इंजिनचे सरकार राज्यात रोजगार निर्माण करण्यात आणि बेरोजगारी दूर करण्यातही अपयशी ठरल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी केला. काँग्रेसचे मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांच्यासह आप नेते रामाराव वाघ आणि शिवसेना नेते (यूबीटी) जितेश कामत यांनी पत्रकार परिषद घेऊन बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपवर टिका केली.

“हे डबल इंजिन जुमला सरकार म्हणून ओळखले जाते. दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. गोवा सरकारनेही हजारो नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र दोन्ही सरकारे अपयशी ठरली आहेत. तथापि, आम्ही इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर 30 लाख सरकारी नोकऱ्या भरण्याचे वचन देतो,” असे पणजीकर म्हणाले.

ते म्हणाले की 2012 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha ELection) भाजपने युवकांना बेकारी भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु गेल्या 12 वर्षांपासून ते देण्यात अपयशी ठरले. “1.38 लाख तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. यावरून राज्यात बेरोजगारी असल्याचे सिद्ध झाले आहे. गोव्यात बेरोजगारी वाढत असल्याचे निती आयोग आणि सीएमआयई यांनीही म्हटले आहे. पण सरकार काहीच करत नाही,” असे पणजीकर म्हणाले.

ते म्हणाले की, भाजपने ‘इंडस्ट्रियल प्रमोशन बोर्ड’ आणले असून त्यातून रोजगार निर्माण होईल असे सांगितले होते. ‘‘यातून केवळ एक हजार नोकऱ्या निर्माण झाल्या. परंतु सरकार त्याचा डेटा देत नाही कारण बहुतेक नोकऱ्या बाहेरच्या लोकांना दिल्या गेल्या असतील,” असे ते म्हणाले. या मंडळाने 17 हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते असे ते म्हणाले.

सरकारने आमच्या जमिनी उद्योगांसाठी दिल्या, पण रोजगार निर्माण करण्यात अपयश आले, असा आरोप पणजीकर यांनी केला. ‘‘4 कोटी रुपये खर्चून मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात आला होता. सुमारे 22 हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केले होते, त्यापैकी केवळ 500 जणांनाच नोकऱ्या मिळाल्या,” असे ते म्हणाले. “भाजपकडे नोकऱ्या निर्माण करण्याची दृष्टी नाही, फक्त ‘मिशन टोटल कमिशन’ची दृष्टी आहे,” असे पणजीकर म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा