Supriya Sule | महागाईची झळ काय असते, याची महिलांना खरी जाणीव असते; महिला मेळाव्यात सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रतिभा पवार, सुनंदा पवार, शर्मीला पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्षा भारती शेवाळे, आमदार रोहित पवार, बारामती तालुकाध्यक्षा वनिता बनकर, इंदापूर तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, दाैंड तालुकाध्यक्षा योगिनी दिवेकर, पोर्णिमा तावरे, शिवव्याख्याते शिवरत्न शेटे, सक्षणाताई सलगर, प्रियंकाताई शेंडकर, विकास लवांडे, संगीताताई ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ बारामती येथे आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित महिलांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकं म्हणतात एका विचाराचा खासदार पाहिजे. केंद्रात काँग्रेस सरकार होतं तरी गुजरातमध्ये गुजरात शायनिंग झालं की नाही? विरोधात असले तरी कामे करता येतात. लोकांशी चांगले वागलं की कामे होतात. विरोधी पक्षात आल्यापासून जास्त टाळ्या आता मिळतात. माझा बाप थकला नाही श्रमलेला आहे. सुखाच्या काळात सोबत राहिलो तर रोहित आईसाठी करतोय तसा मुलगा माझा करेल असं माझी आशा आहे, माझी मुलगी गुणी आहे.असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार कृषी मंत्री असते तर कांद्याला, दुधाला दर मिळाला असता. शेतकऱ्याचे कर्जमाफ झाले असते. २०१४ मध्ये आमची आई म्हणायची तुमचे सरकार येत नाही आणि खरंच सरकार नाही आलं. आमच्या आईची आता कटकट वाढली आहे. आता ती म्हणते आता सरकार जाईल, महागाई वाढली आहे. आपण बुथवर सिलेंडर ठेवू, आपण नमस्कार करून जाऊ. हे म्हणतात विकासासाठी मत द्या, अरे कुणाचा विकास झाला? विकास तर यांचा झाला. असेही सुप्रियासुळे यांनी बोलताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिलांमध्ये माहेर आणि सासर अशी दोन्हींची जबाबदारी घेण्याची ताकत असते. त्यामुळे मी त्यांची टीका आणि आरोपांना जास्त महत्व देत नाही, कारण माझ्यासाठी देश प्रथम, नंतर राज्य, त्यानंतर पक्ष आणि शेवटी कुटुंब आहे. बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती हे त्रिवार सत्य आहे. पवार साहेबांनी शून्यातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले, याची आठवण करुन दिली. त्याचबरोबर मी कधीही विकासकामाचे श्रेय एकटी घेत नाही, कारण विकास हा एकत्र मिळून केला जातो, एकट्याने होत नाही, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशासमोर आज महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या समस्या आहेत. महागाईची झळ काय असते, याची महिलांना खरी जाणीव असते. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि तरूणांचा हाताला रोजगार देण्यासाठी आगामी निवडणूकीत तीन नंबरवरील ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करावे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विशेष म्हणजे मी विरोधी पक्षाची खासदार आहे तरीही केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविण्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ पहिला आला आहे. त्यामुळे सत्तेत असल्यावरच विकास होतो, असे म्हणतात, ते चुकीचे असल्याचे सांगितले. आणि डॉ . मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना जर गुजरातचा विकास होऊ शकतो, तर मग आत्ताच केंद्र आणि राज्यात एका विचाराचे सरकार असेल तरच विकास होऊ शकतो, असा शोध कोणी लावला, कारण कामे करून घेण्याचीही एक पद्धत असते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय