Shivaji Adhalrao Patil: नरेंद्र मोदींच्या सर्व योजना कौतुकास्पद व जनसामान्यांना दिलासा देणाऱ्या

Shivaji Adhalrao Patil : महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) भोसरी दौरा दरम्यान चिखली येथे आयोजित नमो संवाद सभेला उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी गाथा काँलनी, अभंग विश्व फेज सोसायटी, मिरर आरकेड, गव्हाणे आंगण, ग्लोरिया, साई मांगल्य, हरि प्रिया हाईट्स येथिल सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, नमो संवाद संकल्पना ही गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या महत्त्वपूर्ण योजना राबवली गेल्या याचा ऊहापोह मांडण्यासाठी सुरू केला आहे. आणि या उपक्रमाला जनतेकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी दहा वर्षात केलेली कामे दमदार ठरली. नरेंद्र मोदी यांच्याशी फार जवळून काम करण्याची मला संधी मिळाली. दरम्यान मी अनुभवलं २०१४ अगोदरचा आपला देश आणि त्यानंतरचा आपला देश यात फार फरक आता आपल्याला दिसत आहे.

३७० कलम हटविण्याचा निर्णय असेल, तितका धाडसी निर्णय घेण्याची क्षमता कुठल्याच नेत्यांमध्ये नसेल. आत्ताच्या योजना हे जनतेमधील सर्वसामान्य पर्यंत पोहोचणारे आहेत. थेट नळाच्या माध्यमातून १३ लाख ३८ हजार घरांमध्ये पाणी पोहोचवलं आहे. मोदीजींना अमलात आणलेल्या पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या थेट खात्यांमध्ये पैसे जातात, पुढील पाच वर्षातही या योजना लागू राहणार आहे. अशा योजना लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असेही आढळराव पाटील म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा