पॅन आधार कार्डशी लिंक करण्याची आज आहे शेवटची तारिख, आताच पूर्ण करुन लिंकिंगची प्रक्रिया

पॅन कार्ड (Pan Card) हा एक अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र आहे. आजच्या काळात फायनान्सशी संबंधित अनेक कामे करण्यासाठी आपल्याला पॅनकार्डची विशेष गरज आहे. पॅनकार्डच्या मदतीने आर्थिक हेराफेरी सरकार सहज शोधू शकते. तसेच आजकाल अनेक महत्त्वाची कागदपत्रे आधार कार्डशी (Aadhar Card) जोडली जात आहेत. अशा परिस्थितीत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे (Pan Aadhar Link) अनिवार्य करण्यात आले आहे. बर्याच काळापासून, सरकारने पॅन आधार लिंकिंगची मुदत अनेक वेळा वाढवली आहे. आता पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३० जून निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही ३० जून २०२३ पूर्वी तुमचे आधार पॅन कार्डशी लिंक केले नाही; तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. १००० रुपये विलंब शुल्क भरून तुम्ही ३० जूनपूर्वी तुमचा पॅन आधार कार्डशी लिंक करू शकता. अशातच आज आम्ही तुम्हाला आधार आणि पॅन लिंकिंगच्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत –

पॅन आधार लिंकिंगची प्रक्रिया अगदी सोपी आहे.

  1. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डिव्हाइसमध्ये इन्कम टॅक्स वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal/ उघडावी लागेल.
  2. वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर आधार लिंकचा पर्याय दिसेल. तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  3. पुढील स्टेपमध्ये तुमचा आधार आणि पॅन क्रमांक टाका.
  4. आता तुम्हाला व्हॅलिडेट बटणावर क्लिक करावे लागेल. जर तुमचा पॅन आधार कार्डशी लिंक नसेल.
  5. या स्थितीत E-Pay Tax च्या माध्यमातून Continue To Pay हा पर्याय निवडा.
  6. आता तुम्हाला पॅन आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  7. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरचे OTP व्हेरिफिकेशन केले जाईल.
  8. ओटीपी पडताळणीनंतर, तुम्हाला ई-पे टॅक्सवर पुनर्निर्देशित केले जाईल.
  9. येथे तुम्हाला Proceed चा पर्याय निवडावा लागेल.
  10. यानंतर, मूल्यांकन वर्षात २०२३-२४निवडून, पेमेंटच्या प्रकारात इतर पावती (५००) निवडून, १ हजार रुपये भरावे लागतील.
  11. पेमेंट प्रक्रिया पूर्ण होताच तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल.