PM Narendra Modi | तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच मोदींचे शेतकऱ्यांना गिफ्ट; पहा काय केलं पहिले काम

PM Narendra Modi | राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं. यात राजनाथ सिंह यांना संरक्षण, अमित शहा यांना गृह आणि सहकार, निर्मला सीतारामन यांना अर्थ, आणि नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक आणि महामार्ग या आधीच्याच मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. पियूष गोयल यांच्याकडं वाणिज्य तसंच एस. जयशंकर यांच्याकडं परराष्ट्र व्यवहार, ही पूर्वीची खाती कायम ठेवण्यात आली आहेत. शिवराजसिंह चौहान यांना कृषी आणि ग्रामीण व्यवहार खातं देण्यात आलं आहे, तर जे. पी. नड्डा आरोग्यमंत्री असतील. अश्विनी वैष्णव यांना यापूर्वीच्या रेल्वे मंत्रालयासह माहिती आणि प्रसारण हे खातं देण्यात आलं आहे. धर्मेंद्र प्रधान- शिक्षण, मनोहरलाल- ऊर्जा, किरण रिजिजू- संसदीय कामकाज, तर अन्नपूर्णा देवी- महिला आणि बालविकास मंत्री असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जारी केला. याअंतर्गत एकंदर २० हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले असून, त्याचा फायदा नऊ कोटी 30 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. आपलं सरकार शेतकरी कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यामुळे नवीन सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असल्याचं, पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं आपल्या पहिल्याच बैठकीत घतेला. 2015पासून ही योजना राबवली जात असून, या योजनेंतर्गत गेल्या दहा वर्षांत एकंदर 4 कोटी 21 लाख घरं बांधून पूर्ण झाली आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप